गाव विकासाच्या ‘नाल्यात’ विहीरगाव ग्रा.पं.चा कारभार रामभरोसे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : तालुक्यातील विहीरगाव, टेंभरी आणि आवळी या तीन गावांचा डोलारा सांभाळणारी ‘विहीरगाव गट ग्रामपंचायत’ सध्या भ्रष्टाचाराच्या आणि अकार्यक्षमतेच्या ढिगाºयाखाली दबली गेली आहे. जनतेच्या पैशातून विकास करण्याऐवजी केवळ ठेकेदारीतून स्वत:चे खिसे कसे गरम करता येतील, यातच सध्याचे प्रशासन मग्न असल्याचा संतप्त आरोप नागरिकांकडून केला जात आहे. यासह विहीरगाव ग्रामपंचायतीची इमारत सन २०१२ मध्ये तयार करण्या आली असून, ती जर्जर झाली आहे. पावसाच्या दिवसात स्लँब गळत असून, यामुळे कॉम्प्युटर, प्रिंटर, फर्निचर अन् रेकॉर्ड देखील कुजले गेले आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाचा निष्काळजीपणा येथेच थांबत नाही. सन २०१२ मध्ये बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायत इमारतीला अद्याप साधा रंगही देण्यात आलेला नाही. देखभाल अभावी ही इमारत आता ठिकठिकाणी गळत आहे. इमारतीचे लाकडी दरवाजे आणि महागडे फर्निचर कुजून गेले आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे, गावाची कुंडली असलेले अनेक महत्त्वाचे शासकीय रेकॉर्ड (दस्तऐवज) पाण्यात भिजून नष्ट झाले आहेत.

गावातील जनता आरोग्याच्या विळख्यात अडकली आहे, शासकीय मालमत्तेचे नुकसान होत आहे, पण ग्रामपंचायत प्रशासनाला याचे काहीही सोयरसुतक नाही. जनतेच्या मूलभूत समस्या सोडवण्याऐवजी केवळ ‘कमिशन’ आणि ‘ठेकेदारी’ कशी पदरात पाडून घेता येईल, यावरच सत्ताधाºयांचा डोळा आहे. आता या गंभीर प्रकरणाची जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारा यांनी स्वत: दखल घेऊन दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी विहीरगाव येथील संतप्त नागरिक करत आहेत. उन्हाळ्यात पावसाळ्याचा फील..! संडास-बाथरूमचे पाणी रस्त्यावरसध्या कडक उन्हाळा सुरू असतानाही विहीरगावच्या मुख्य रस्त्यांना मात्र नाल्यांचे स्वरूप आले आहे. गावातील नाल्या तुडुंब भरून वाहत असून, घरगुती संडास आणि बाथरूमचे दुर्गंधीयुक्त पाणी थेट रस्त्यावर साचले आहे. नागरिक त्रस्त: गावातील ताराचंद राऊत, संतोष राऊत आणि भाऊराव ढोरे यांच्या घरासमोर तर पाण्याचे अक्षरश: तळे साचले आहे. अंधाधुंद नियोजन: नाल्यांचे बांधकाम करताना पाण्याचा निचरा कसा होणार, याचे कोणतेही तांत्रिक नियोजन केले गेले नाही. काही शेतकºयांनी शेतात पाणी घेण्यास नकार दिल्याने ही समस्या आता गावकºयांच्या आरोग्यासाठी कर्दनकाळ ठरत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *